मी एक भिक्षेकरी
अंबे आलो तुझ्या ग द्वारी
॥ धृ ॥
अज्ञानाचे वस्त्र ल्यायले
विश्वास पात्र करी घेतले
पाप पुण्याची झोळी घेतली
॥ १ ॥
आशेची तृष्णा ही लागली
तुझ्या कृपेची छाया लाभली
लिनता लेकरू पदरी
॥ २ ॥
दया क्षमेची तु माऊली
सद्बुध्दीची भिक्षा वाढली
दिन दुबळ्यांची तु कैवारी
॥ ३ ॥
卐 卐 卐 卐 卐