भस्म सुशोभित कोमल काया ।
दारी आला हा यती
मागतो भिक्षा ओम् भवती
।।धृ।।
त्रिभुवन सारे जेवू घाली । पालन पोषण सर्वावाली ।
पंचभूते ही सृष्टी सारी । खेळे ज्याच्या हाती
।।१।।
कामधेनूचा मंगल वास । इच्छित जे जे मिळते ज्यास ।
परि हिंडे हा दारो दारी । त्रैलोक्याचा पती
।।२।।
दश अवतारी जन्म घेऊनी। थकलासे हा रक्षुन अवनी ।
अजुन धावे संकट पडतां । शोधीत राने किती
।।३।।
अघटित करणी गुरूरायाची । नाही कुणाला समजायाची ।
कष्ट तनुसी कांही असावे । असेल ज्याची मती
।।४।।
अन्नपूर्णे सदापूर्णे, शंकर प्राणवल्लभे
ज्ञान वैराग्य सिद्धार्थ्यं भिक्षां देहिच पार्वती
ओम भंवती भिक्षान् देही
卐 卐 卐 卐 卐