( चाल - जय जय श्रीमद्गुरुवर )
आरती करुया मनोभावे गुरुग्रंथाची
गुरुचरित्र नोहे दत्त, ठेवा अंतरी
॥धृ॥
गुरु, शिष्य हा संवाद ठेवा मनी नित्य
कधी ना राहील कुणा ही दुःख, सुखी जीवनात
।।१।।
ज्ञान, कर्म, भक्ती सरीता त्रिवेणी संगम
प्राशन करुनी हे नित अमृत, होऊ या धन्य
।।२।।
लेखन करुनी सायंदेव, झाले जगी धन्य
मकरंद प्रार्थितो गुरुदेवांसी, ठेवा शिरी हस्त
।।३।।
卐 卐 卐 卐 卐