।। आरती श्रीपाद श्रीवल्लभांची ।।

( चाल - आरती सप्रेम जय जय )

आरती करुया भावे, श्रीगुरुदत्ताची
सगुण रुप श्रीपाद वल्लभ, सद्‌गुरु रायांची
।।धृ।।

भक्त उद्धाराकारणे मानव जन्म
श्रीपाद श्रीवल्लभ होऽऽ ।
नामे घेती हो जन्म
दत्त घेती हो जन्म
।।१।।

जन्मभूमी ही पीठापूर झाली पावन
फिरून अवघा देश । होऽऽ
लावीले सन्मार्गी भक्त
।।२।।

धन्य कृष्णामाई वाहे या धरणीवर
तिच्या उदरी वसले होऽऽ
बेट नाम कुरवपूर
।।३।।

कुरवपूर हे क्षेत्र झाले स्वामींचे धाम
येती अनंत भक्त होऽऽ
प्रभु रक्षिती नित्य
।।४।।

पंचप्राण ओवाळुनी करू आरती भावे
मकरंद भक्त प्रार्थिती होऽऽ
स्वामी दावा निजरूप
।।५।।

卐 卐 卐 卐 卐