।। आरती श्रीसद्‌गुरुंची ।।

( चाल - जय जय श्रीमद्गुरुवर )

अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्रीसद्‌गुरुराया
अनंत रूपे तत्व एकची, आरती गुरुराया
।।धृ।।

आदी अंती दावी प्रचिती, जन्मुनी नर देही
राम कृष्ण श्रीपाद वल्लभ, अगणित नामानी
दिव्यत्वाची अखंड ज्योती, तत्व बोध मुर्ती
।।१।।

गुरूसारिखे दैवत नाही, या जगती थोर
अनंत नामे अनंत रूपे, परि तत्त्व एक
निजभक्ता प्रभु द्यावी सुबुद्धी, न करण्या भेद
।।२।।

गुरुचरित्री गुरुतत्त्वाचे, अखंड चिंतन
मनी ठसता तत्त्वबोध, अलभ्य दर्शन
अनंत भक्ता लाभो दर्शन, प्रार्थी मकरंद
।।३।।

卐 卐 卐 卐 卐