।।आरती श्रीगुरुदत्तांची ।।

( चाल आरती कुंजबिहारी की )

आरती श्री गुरुदत्तांची, श्री नृसिंह सरस्वती प्रभुंची
।।धृ।।

दत्ताचा सणुग अवतार, रुप बहू साजिरे सुंदर
कटीवर छाटी भगवी ही, गळ्यामध्ये रुद्र माळ कंठी
पायी खडावा शोभती, विभुती शोभते सर्वांगी
राहती औदुंबरा तळी, वंदुया चरण, अर्पनी सुमन,
करू या पूजन, आवोळुनी पंचप्राण ज्योती
।।१।।

त्रिभुवनी संचार करती, संन्यास काशीपुरी घेती
परतुनी ग्रामासी येती, माता पित्या निजरूप दाविती
माता पिता आशिष देती, उणे ना कधी ना तुम्हासी
परतूनी देशाटना जाती, जेथे ते जाती, क्षेत्रे ती होती,
भक्त बहू जमती, वंदीती श्री गुरू चरणासी
।।२।।

बासर औदुंबर वाडी, गाणगापुरी संगम थोरी
नित्य घेती भिक्षा ग्रामासी, अनंत भक्ता उद्धरती
करुया मनोभावे आरती, लावुनी देह पोत चरणी
जाऊया रंगुनी भजनी, प्रार्थितो नित्य, दास मकरंद,
घडो मज नित्य, सेवा श्री गुरू चरणांची
।।३।।

卐 卐 卐 卐 卐