।। वाहू सुमने - पुष्पांजली ।।

( चाल वाहू सुमने तव पद कमली )

भाव फुलांची अर्पितो सुमने, श्रीगुरू ग्रंथासी
भक्तीरसाची अमृतवाणी, द्या निज दासासी
।।धृ।।

येईल तैसी करीतो सेवा, नाही बुद्धी माझी
अखंडानंद तुझेच भक्त, देती शब्द दृष्टी
।।१।।

भाव फुलांची अर्पितो ओंजळ, तुझीया नीत चरणी
घ्यावी मानुनी भाव सुमने, पुष्प गुलाबांची
।।२।।

बिल्व मंजिरी अनंत कुसुमे, शब्द प्रतिभेची
नकोच न लगे मीपण मजला, बुद्धी द्यावी ऐसी
।।३।।

मम मानसी प्रार्थितो नित्य, सेवा घडो साची
प्रार्थितो मकरंद सरू द्या जीवन, सेवा करताही
।।४।।

卐 卐 卐 卐 卐