( चाल - धन्य धन्य हो प्रदक्षिणा )
करु प्रदक्षिणा प्रदक्षिणा
श्रीगुरु ग्रंथाची
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी
श्री गुरुदत्तांची
।।धृ।।
सर्व देव सर्व तिर्थ, श्रीगुरुचरित्र ।
हो श्रीगुरुचरित्र
करता प्रदक्षिणा भाव ठेवा,
हाच मनी नित्य
ठेवा भाव मनी नित्य
।।१।।
सुस्वर पेटी साथ लाभली,
सुंदर ढोलकीची
दिगंबराचा गजर करुया,
देह भाव हरुनी ।
होऽऽ देव भाव हरुनी
।।२।।
समर्थ माणिक वासुदेव साई,
येती धाऊनी। होऽऽ येती धाऊनी
सामिल झाले सर्व संत,
संतपणा भुलुनी
होऽऽ संतपणा भुलुनी
।।३।।
त्रिभुवनी एकच सत्य, श्रीगुरुचरित्र ।
होऽऽ श्रीगुरुचरित्र
गुरुविणा ना मिळाले ज्ञान,
हो या जगती कोण
।।४।।
प्रदक्षिणा करुनी देह,
भावे वाहिला ।
होऽऽ भावे वाहिला
मकरंद प्रार्थितो द्यावे दर्शन,
अनंत भक्तांना
होऽऽ अनंत भक्तांना
।।५।।
卐 卐 卐 卐 卐