।। मागणे।।

( चाल - गातो आवडीने )

ग्रंथरुपी श्रीगुरुराया, दया हो कृपादान
श्रीगुरुंची सेवा करण्या द्यावे मती ज्ञान
।।धृ।।

मार्ग दाविण्या भक्तासी, लीला केली थोर
सिद्ध नामधारकासी, करुनी निमित्य
करता करविता थोर, नरहरी दत्त
।।१।।

ग्रंथ वाचिता नेमाने, कळे त्यात काय
तव कृपेवीण कैसे, कळेल मनास
चंचलता दूर करोनी, ठेवा मन शांत
।।२।।

श्रीपाद श्री नरहरी दत्ता, येऊ द्याना कीव
सेवा करुन घ्या प्रभु गोड, काही नको अन्य
मकरंद प्रार्थितो हा, द्या हो मतिज्ञान
।।३।।

卐 卐 卐 卐 卐