।। गुरु ग्रंथ चिंतनाची ।।

( चाल - अवधूत चिंतनाची )

गुरुग्रंथ चिंतनाची, कळु द्या जगास महती
प्रभु नरहरी श्री दत्त, द्यावा आशिष तुम्ही
।।धृ।।

कलीचा प्रकोप थोर, मनी लागली हो घोर
अध्यात्माचा बाजार, बहु चालला व्यापार
।।१।।

गुरुतत्त्व बोध थोर, सांगेना कुणी सत्य
भरडुनी जाती भक्त, प्रभु येऊ द्याना कीव
।।२।।

तुमचे चरित्र थोर, रवी किरणाहूनी श्रेष्ठ
उमगेल साऱ्या विश्वा, सरेल काळ रात्र
।।३।।

प्रभु पाहू नका अंत, पुरवाना वेडी आस
होऊनी कृपावंत, करा धन्य मकरंदास
।।४।।

卐 卐 卐 卐 卐