( चाल - जय जय साईनाथ )
श्रीपाद श्रीवल्लभर नरहरी, तुम्हीच श्री गुरुदत्त हो
भवभयहारक दुःख निवारक, भक्त वत्सल सत्य हो
।।धृ।।
तव लिलेचा अगाध महिमा, वर्णिला गुरु ग्रंथी हो
गुरुचरित्राचे करण्या लेखन, तुम्हीच दिधले ज्ञान हो
नामधारका सिद्ध सांगती, गुरुचरित्र थोर हो
बहु उपकार लिहून केले, सायंदेव धन्य हो
।।१।।
मातृभाषा असुन कानडी, ग्रंथ लिहीला प्राकृत हो
वर्ण कसा स्वामी महिमा तुमचा, नाही मजसी ज्ञान हो
ध्यास लाविला तव चरिताचा, अखंडानंद थोर हो
येईल तैसी सेवा करीतो, मानुनी घ्या प्रभु गोड हो
।।२।।
मुर्ख ब्राह्मणा परि ज्ञान द्या, मागतो तव पदी दान हो
तव कृपेने बोलीला वेद, क्षुद्र असूनी सत्य हो
तुम्ही कृपाघन पतित पावन, भक्त रक्षक सत्य हो
सेवा करुन घ्या तव चरणांची, श्रीगुरुराया नित्य हो
।।३।।
स्वामी माझे गणेश शारदा, हेच मजसी ठाव हो
लिहिणे, बोलणे, गायन वादन, नाही याचे ज्ञान हो
सेवा घडो मज तव चरणांची, हा अंतरी ध्यास हो
कधी न घडावा वियोग तुमचा, भक्ता द्यावे दान हो
।।४।।
रवी किरणाहुनी दिव्य तेज परि, सुधाकर परी सत्य हो
तव दासाला द्यावी प्रतिभा, अहमभावाविण सत्य हो
देह पोत हा लाविला तव पदी, कळेना मी आहे कोण हो
तव पदी अर्पू द्या अनंत कुसुमे, मकरंदास नित्य हो
।।५।।
卐 卐 卐 卐 卐