।। श्रीगुरू दत्ता जय भगवंता ।।

श्रीगुरू दत्ता जय भगवंता ।
ते मन निष्ठुर न करी आतां ॥धृ॥

चोरे द्विजासी मारिता मन जे
कळवळले ते कळवळो आता । श्रीगुरू दत्ता
।।१।।

पोटशुळाने द्विज तडफडता
कळवळले ते कळवळो आता । श्रीगुरू दत्ता
।।२।।

द्विजसुत मरता वळले ते मन
हो की उदासिन न वळेचि आता । श्रीगुरू दत्ता
।।३।।

सतिपती मरता काकुळती येता
वळले ते मन न वळे की आतां । श्रीगुरू दत्ता
।।४।।

श्रीगुरू दत्ता त्यजी निष्ठुरता
कोमल चित्ता वळवी आतां । श्रीगुरू दत्ता
।।५।।

卐 卐 卐 卐 卐