।। जय करूणाघन ।।

जय करूणाघन निजजन जीवन
अनसुया नंदन पाहि जनार्दन
जय करूणाघन
।।धृ।।

निज अपराधे उफराटी दृष्टी
होऊन पोटी भय धरू पावन
जय करूणाघन
।।१।।

तू करूणाकर करि आम्हांवर
रूससि न किंकर वरद कृपाघन
जय करूणाघन
।।२।।

वारी अपराध तू मायबाप
तवं मनी कोप लेश न वामन
जय करूणाघन
।।३।।

बालकापराधा गणे जरी माता
तरी कोण त्राता देईल जीवन
जय करूणाघन
।।४।।

प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव
पदी ठेवोठाव देव अत्रिनंदन
जय करूणाघन
।।५।।

卐 卐 卐 卐 卐