।। श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी तारि ।।

श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी तारि तारि मजला
दयाळा तारि तारि मजला
श्रमलो मी या प्रपंच धामी आलो शरण तुला
।।धृ।।

करिता आटा आटी प्रपंच दिसतो मिथ्यत्व
दयाळा दिसतो मिथ्यत्व
म्हणून चरण तुझे मज देवा भासे सत्यत्व
।।१।।

किंचित् मात्र कृपा करि । मजवरि करिसी उदार मन
दयाळा करिसी उदार मन
चुकलो मी या विषयसुखाच्या आहारातुनि जाण
।।२।।

कृष्णातट निकटी जो विलसे औदुंबर छायी
दयाळा कल्पतरू छायी
हंस परात्पर भारति नायक लीन तुझे पायी
।।३।।

卐 卐 卐 卐 卐