।। श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी वासुदेवानंदा ।।

( चाल - अईगिरी नंदीनी )

श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी, वासुदेवानंदा दिगंबरा
त्रिवार वंदन अत्रिनंदना, श्रीगुरुदत्ता यतिश्वरा
।।१।।

तव कार्याची पूर्ती होण्या, रहा संगती प्रभूवरा
अशक्य जे जे होईल शक्य, तव कृपेने यतिश्वरा
।।२।।

गुरूचरित्र सारामृत, गुरू भक्तीचा मार्ग भला
गुरुतत्वाच्या ज्योती लाविण्या, शक्ती बुध्दी द्या दिगंबरा
।।३।।

करते करविते श्रीगुरु आपण, सेवा करणे धर्म भला
सुटू दे संगत सहा रिपुंची, श्रीगुरूदत्ता दिगंबरा
।।४।।

प्रभो दयाघन, प्रभो कृपाघन, श्रीगुरूदत्ता दिगंबरा
मकरंद भक्त करतो प्रार्थना, सेवा करून घ्या यतिश्वरा
।।५।।

卐 卐 卐 卐 卐