।। श्री अनंत कोटी ब्रह्मांडनायक ।।

( चाल - अनन्य भावे )

श्री अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री सद्‌गुरू राया,
अनन्य भावे करतो प्रार्थना उद्धारा दासा
॥धृ॥

तव आज्ञेने योजिले कार्य, आहे बहु थोर
जुळूनी कैसे येईल सारे, तुम्हा आहे ठाव
।।१।।

अनंत रूपे अनंत नावे, परितत्त्व एक
श्रीगुरू सारे कर्ते करविते, मी तो निमित्त्य
।।२।।

तवनिज कार्य करण्या प्रभू दया, सन्मती भक्तासी
धन द्रव्य आणि द्याहो नियोजन, सुयश प्राप्तीसी
।।३।।

तव कृपेवीन जाईल कैसे, कार्य सिद्धीस
हृदय मंदिरी रहावे सतत, प्रार्थितो दास
।।४।।

रेवातीरी करतो प्रार्थना, भो सद्‌गुरूराया
पाहू नका हो अंत प्रभूजी, या सत्वर या ना
।।५।।

शब्द सुरांची सुरेल संगत, येऊ द्या बहरा
तव चरिताचा कीर्ती सुगंध, दरवळण्या देवा
।।६।।

पूर्ती करून घ्या तव कार्याची, करतो प्रयत्न
सुयश द्यावे भो गुरुनाथा, प्रार्थी मकरंद
।।७।।

卐 卐 卐 卐 卐